मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी (दि. १४ जून) वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज यांनी निवासस्थानाबाहेर येऊन शुभेच्छा स्वीकारल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत येत असतात. यावेळी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ आणि हारतुरे देत राज यांचं अभिष्टचिंतन केलं जातं. मात्र यंदाच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्रक काढत आपल्या कार्यकर्त्यांना खास आवाहन केलं आहे. ‘शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा,’ अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.