Sir David Attenborough 100th Birthday : सर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; सर डेव्हिड अटेनबरो नक्की आहेत तरी कोण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणी असले असले तरी साहित्य, कला, संगीत, इतिहास आधुनिक तंत्रज्ञान या सर्वा विषयांवर त्यांची विशेष रुची आहे. जगातील सर्व क्षेत्रातीत विविध घडामोडींची माहिती त्यांना असते. तसेच त्याबाबतचे त्यांचे वाचन, अभ्यास आणि आवड त्यांनी नेहमीच सोशल माध्यमांवरून वेळोवेळी व्यक्त केली आहे. अशीच एक आगळीवेगळी पोस्ट आज, 8 मे रोजी राज ठाकरे […]

Sir David Attenborough 100th Birthday : सर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; सर डेव्हिड अटेनबरो नक्की आहेत तरी कोण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणी असले असले तरी साहित्य, कला, संगीत, इतिहास आधुनिक तंत्रज्ञान या सर्वा विषयांवर त्यांची विशेष रुची आहे. जगातील सर्व क्षेत्रातीत विविध घडामोडींची माहिती त्यांना असते. तसेच त्याबाबतचे त्यांचे वाचन, अभ्यास आणि आवड त्यांनी नेहमीच सोशल माध्यमांवरून वेळोवेळी व्यक्त केली आहे. अशीच एक आगळीवेगळी पोस्ट आज, 8 मे रोजी राज ठाकरे यांनी एक्सवरून केली आहे. ती म्हणजे सर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या बाबतची माहिती. सर डेव्हिड अ‍ॅटनबरो हे आज 100 वा वाढदिवस साजरा करत असून या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रसारक, इतिहासकार, निसर्गशास्त्रज्ञ आणि चित्रपट व्यक्तिमत्व म्हणून असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या भरीव योगदानाबाबत त्यांचे आभारदेखील व्यक्त केले आहेत. जाणून घेऊया पसर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्याबाबत…

हेही वाचा : Vladimir Putin : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एखाद्या राजमहालात नाही तर, बंकरमध्ये राहतात; काय आहे यामागचं कारण?

जगप्रसिद्ध प्रसारक, इतिहासकार, निसर्गशास्त्रज्ञ आणि चित्रपट व्यक्तिमत्व असलेल्या डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 मे 1926 रोजी जन्मलेल्या अ‍ॅटनबरो यांनी लेखक म्हणून काम करण्यासह अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे. तसेच माहितीपट आणि मालिकांमध्ये सादरकर्ता आणि निवेदक म्हणूनही त्यांच्या नावावर नोंद आहे. डेव्हिड ॲटनबरो यांच्या दशकांहून अधिक काळाच्या कार्याचा विचार करता, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या प्रसारक-निसर्गशास्त्रज्ञाने सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छांना प्रतिसाद दिला आहे. ‘द इंडिपेंडंट’ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हॉइस नोटमध्ये, ॲटनबरो म्हणाले की त्यांना आपला १०० वा वाढदिवस ‘शांतपणे’ साजरा करायचा होता. तथापि, ते पुढे म्हणाले, “असे दिसते की तुमच्यापैकी अनेकांच्या मनात वेगळेच विचार आहेत. बालवाडीतील गटांपासून ते वृद्धाश्रमातील रहिवाशांपर्यंत आणि सर्व वयोगटातील असंख्य व्यक्ती व कुटुंबांकडून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मी पूर्णपणे भारावून गेलो आहे. मी तुम्हा प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊ शकत नाही, परंतु तुमच्या प्रेमळ संदेशांसाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो आणि ज्यांनी उद्या स्वतःच्या स्थानिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number