मराठी चित्रपटांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे ?

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : अलीकडे एकापाठोपाठ बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट हा मोठा चर्चेचा विषय झाला होता. कारण मराठी चित्रपटांना चित्रपट गृहांमध्ये जागा मिळत नसल्याने बरेच वाद झाले. हिंदी आणि मराठी चित्रपटांची जुगलबंदी सुरु असताना बऱ्याच हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपट मागे पडले यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]

मराठी चित्रपटांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे ?

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : अलीकडे एकापाठोपाठ बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट हा मोठा चर्चेचा विषय झाला होता. कारण मराठी चित्रपटांना चित्रपट गृहांमध्ये जागा मिळत नसल्याने बरेच वाद झाले. हिंदी आणि मराठी चित्रपटांची जुगलबंदी सुरु असताना बऱ्याच हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपट मागे पडले यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असतात. अलीकडेच त्यांनी बदलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना मराठी चित्रपटांसमोरील समस्यांवर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, ”त्यासाठी आम्हीच आंदोलन केले. मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून मनसेनेच पुढाकार घेतला होता. पण एका आठवड्याला 10-10 चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर आपण तरी काय करणार.. कुणाकुणाला चित्रपटगृह मिळणार..?”

ठाकरेंच्या या विधानामुळे बऱ्याच चर्चा होऊ लागल्यात. दिवसागणिक प्रदर्शित होणारे हे चित्रपट आणि चित्रपटगृहांची उपलब्धता यांचे गणित साधले जात नसल्याने अशा संशय उद्भवत आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली,

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number