जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे परिसरात असलेल्या फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करत रेल्वे परिसर प्रवांशांसाठी मोकळा केला.
आता राज ठाकरे यांनी आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवला आहे. राज यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं. यावेळी राज यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही आयुक्तांना सुचवल्या असल्याचं यावेळी सांगण्यात आले.
राज ठाकरे यांच्या निवेदनानंतर महापालिका फेरीवाल्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.