जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेतील सहा नगरसेवक शिवसेनेसोबत गेल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसेत उरलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना गटनेते म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र शुक्रवारी राज ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला पाठवलंय.
पक्षानं केलेल्या नियुक्तीनंतर प्रशासनाला तसे सभागृहात जाहीर करावे लागते. पक्षात एकापेक्षा अधिक नगरसेवक असेल तरच गटनेता म्हणून नियुक्ती करता येतो, असा नियम आहे.
मात्र, यापूर्वी मनोज संसारे यांनी एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन गटस्थापन केला होता आणि त्याला कोकण आयुक्तांने मंजुरी दिली होती. त्यानंतर हा नियम पालिकेत लागू झालाय.
त्यामुळे या तांत्रिक बाबींचा विचार करून तसेच विधी विभागाच्या सल्ल्यानुसार याबाबत निर्णय़ घ्यावा लागणार आहे.