जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला आहे. राज्यात सर्व ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत झालेल्या जलसमाधी आंदोलनात एकाचा मृत्यू झाला तर दुसर्याने विष घेऊन आपला जीवनप्रवास संपवला.
आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जीवाचीही परवा न करता आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलकांना भावनिक आवाहन केले आहे.
तसेच सरकारला इशाराही दिला आहे. या पत्रामध्ये राज ठाकरेंनी ‘मराठी तरूणांनी आपला जीव गमावू नका, घरी तुमची वाट पाहणारे कुणीतरी आहे’. असे सांगितले आहे तसेच सरकारनं वास्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी उगाच लोकांच्या मनाशी आणि भावंनाशी खेळत बसू नये असा इशाराही सरकारला दिला आहे.
राज ठाकरेंच आंदोलकांना आवाहन आणि सरकारला इशारा
महाराष्ट्रातील माझ्या भावा-बहिणींना आवाहन आणि सरकारला इशारा… pic.twitter.com/lytcslWQiG — Raj Thackeray (@RajThackeray) July 26, 2018
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा जलसमाधी
सकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन….
मराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी – चंद्रकात पाटील
मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन….