जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई
सीबीएसई पेपरफुटीप्रकरणात आता मनसेने उडी घेतलीय. पेपर फुटल्यानंतर पुन्हा घेण्यात येणाऱ्या फेरपरिक्षेला विद्यार्थ्यांना बसवू नका. असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालकांना केलयं. सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटल्या हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावता?. असा सवाल मनसेकडून करण्यात आलाय.
तसेच, तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्ही निर्णयावर ठाम रहा, असा सल्ला राज ठाकरेंनी पालकांना दिलाय.
ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात? चर्चांना उधाण
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रीय आहेत. पण आता उद्धव ठाकरेंचे आणखी एक सुपुत्र राजकारणात सक्रीय होतात की काय?, असा प्रश्न पडतोय. त्याला कारण म्हणजे आजच्या सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांचा फोटो झळकलाय. युवासेनेने विद्यापीठातील निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देणारी ही जाहिरात आहे. या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली तेजस ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध कऱण्यात आलायं. आता या प्रसिद्ध झालेल्या फोटोमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा लवकरच राजकारणात सक्रीय होतोयं की काय, अशी चर्चा आता रंगू लागलीय.
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे; ऑनलाईन सातबारा घोळ
माढा येथील शालनबाई गजेंद्र घोलप व आनंद विश्वनाथ मासाळ या दोन शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर चक्क दुसऱ्याच्या उताऱ्यावरील तब्बल 13 कोटी 50 लाखांचा बोजा चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, जिल्हा निबंधक कार्यालयाच्या या घोडचुकीचा मानसिक त्रास या दोन्ही शेतकरी कुटूंबियांना सहन करावा लागतोय. सात बारा उताऱ्यावर अचानक 13 कोटी 50 लाख रुपयांचा बोजा कसा काय चढवला गेला. याप्रश्नानं हे शेतकरी कुटुंब बुचकळ्यात पडलंय. आता शालनबाई घोलप या शेतकरी महिलेने कायदेशीर लढा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या दोन्ही चुका तांत्रिक अडचणी आणि अनावदानानं झाल्याची कबुली माढा महसूल प्रशासन तसेच सहायक दुय्यम निबंधक यांनी दिलीय. या प्रकारामुळे सरकारच्या ऑनलाईन सात बारा उताऱ्यावर विश्वासार्हता ठेवायची तरी कसा असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलाय.
‘तपास यंत्रणा खरं काय ते बाहेर काढतील’ – संजय निरुपम
जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई
भाजप आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप होत असताना आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याप्रकरणी भाष्य केलंय. “आपल्या बचावासाठी त्यांनी आवाज आपला नसल्याचा सांगितलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी नेमकं खरं काय आहे, हे तपास यंत्रणा उघड करेल. परंतु, तपास यंत्रणेवर आता नागरिकांचा विश्वास राहिला नाही, असे सांगत तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही निरुपम यांनी संशय व्यक्त केलाय.
सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी राज ठाकरेंचा पालकांना सल्ला
जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई
सीबीएसई पेपरफुटीप्रकरणात आता मनसेने उडी घेतलीय. पेपर फुटल्यानंतर पुन्हा घेण्यात येणाऱ्या फेरपरिक्षेला विद्यार्थ्यांना बसवू नका. असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालकांना केलयं. सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटल्या हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावता?. असा सवाल मनसेकडून करण्यात आलाय. तसेच, तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्ही निर्णयावर ठाम रहा, असा सल्ला राज ठाकरेंनी पालकांना दिलाय.