राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पेडर रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली.  यांच्या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. गुढीपाडव्या निमित्त मनसेचा उद्या रविवारी मेळावा आहे. या मेळाव्यात राज हे मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार […]

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पेडर रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली.  यांच्या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. गुढीपाडव्या निमित्त मनसेचा उद्या रविवारी मेळावा आहे. या मेळाव्यात राज हे मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून  पुढील राजकीय वाटचालीचं मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number