राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासह ते या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे. राज ठाकरे हे शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या […]

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासह ते या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे.

राज ठाकरे हे शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. ही भेट नेमकी कोण्यत्या कारणासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं बोललं जात आहे. पण या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. कारण यामागे काही नव्या राजकीय समिकरणांची देखील चर्चा केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number