घटस्थापनेच्या मुहुर्तावर मनसेची ‘राज’गर्जना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     मनसे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील धडाडीचे नेते राज ठाकरेंची गुरुवारी फेसबुकवर एंट्री होणार आहे. तरुणांशी थेट संपर्क साधण्याच्या हेतूने राज ठाकरे आपल्या फेसबुक पेजचे अनावरण करणार आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.   ‘व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असे या टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले […]

घटस्थापनेच्या मुहुर्तावर मनसेची ‘राज’गर्जना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

मनसे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील धडाडीचे नेते राज ठाकरेंची गुरुवारी फेसबुकवर एंट्री होणार आहे. तरुणांशी थेट संपर्क साधण्याच्या हेतूने राज ठाकरे आपल्या फेसबुक पेजचे अनावरण करणार आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

‘व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असे या टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. घटस्थापनेच्या मूहूर्तावर राज ठाकरे आपल्या फेसबुक पेजचे अनावरण करणार आहेत. 

 

‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया’  असा व्हिडिओ त्यांनी आपल्या पक्षाच्या ट्विटर हॅंन्डलवर शेअर केला आहे. आजची तरुण पिढी सोशल मिडियावर खूपच अक्टिव्ह पाहायला मिळते, त्यामुळे तरुणांशी थेट संपर्क साधून त्यांच्याशी परस्पर संवाद साधण्यासाठी त्यांनी या मार्गाचा अवलंब केला आहे.

 

म्हणून राज ठाकरेंनी केले फेसबुक पेजचे अनावरण  

 

– वर्तमान पत्रातून शक्य नाही, म्हणून फेसबुकचा विचार केला.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर वर 48 टक्के आणि राहुल गांधींच्या 54 टक्के फेक फॉलोवर्स, सोशल मिडियावर हे लपून राहत नाही. 

– नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे सांगणारा मी होतो – राज ठाकरे

– गेली 60 वर्ष हा देश फक्त भाषण ऐकत आला आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number