मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने दिला दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल झालेला खटला रद्द करण्यात आला.   2012मध्ये मुस्लीम संघटनांनी काढलेल्या मोर्चाला आझादमैदानाजवळ हिंसक वळण लागले होते. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर, 40 जण जखमी झाले होते.   जमावाने पोलिसांना मारहाण […]

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने दिला दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल झालेला खटला रद्द

करण्यात आला.

 

2012मध्ये मुस्लीम संघटनांनी काढलेल्या मोर्चाला आझादमैदानाजवळ हिंसक वळण लागले होते. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर, 40 जण जखमी झाले होते.

 

जमावाने पोलिसांना मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढला होता. मात्र, परवानगी नसली

तरी मोर्चा काढणारच अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली होती.

 

या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातील मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील गर्दी हाताळणे कठीण होत असल्याने शेवटी पोलिसांना राज ठाकरेंना

विनंती करावी लागली होती. याप्रकरणात राज ठाकरेंविरोधात खटला सुरु होता. हा खटला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number