जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत राजगडावर मनसैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातुन पद्धअधिकारी शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यंदा आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यंदा राज ठाकरे कार्यकर्त्यांकडून कर्ज माफी नको कर्ज मुक्ती हवी असा संदेश असल्याचा केक कापणार
आहेत.
गेल्यावर्षी राज ठाकरेंनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा चेहरा असलेला केक कापला होता. मनसेच्या स्थापनेच्या काळात राज ठाकरेंनी भैय्या असं
लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केला होता.