राज ठाकरेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

वृत्तसंस्था, मुंबई   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार असल्याचे वृत्त आहे. मिताली बोरूडेसोबत अमितचा साखरपुडा होणार आहे. साध्या पध्दतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे. मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार असल्याचे […]

राज ठाकरेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

वृत्तसंस्था, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार असल्याचे वृत्त आहे.

मिताली बोरूडेसोबत अमितचा साखरपुडा होणार आहे. साध्या पध्दतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे. मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार असल्याचे समजते.

मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. अतिशय मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पध्दतीने हा साखरपुडा होणार आहे.  कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल अशी माहिती आहे.

 

 

amit-mitali-thackeray.jpg

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number