जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पून्हा एकदा कार्टूनच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणूकीत मतदार याद्या आणि ईव्हीएम मशिनमध्ये गडबड झाल्याची कबुली उत्तर प्रदेश राज्याचे निवडणूक आयुक्त एस.के अग्रवाल यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अमित शहा हे ईव्हीएम मशिनवर उभे राहून विजयाची निशाणी करत असल्याचे रेखाटतानाच हेच मशिन भाजपसाठी सत्ता आणि सत्तेचा महामार्ग असल्याची टीका केली आहे.
मालकांच्या दबावामुळे प्रचार माध्यमे शांत बसल्याचेही या व्यंगचित्रातून रेखाटण्यात आले आहे.