जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काही दिवसांपूर्वी झालेल्या कोरेगाव-भीमा दंगली प्रकरणावर त्यांनी एक व्यंगचिंत्र रेखाटलंय.
या व्यंगचिंत्रातून छत्रपती शिवाजी महाराज सर्व लेकरांना जातीपातीच्या चिखलातून बाहेर येण्याचं आवाहन करतायंत असं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेखाटलंय.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर हा व्यंगचित्राचा बॅकलॉग असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. तसंच या व्यंगचित्रातून योग्य तो बोध घ्याल, अशी आशाही राज ठाकरेंनी व्यक्त केलीय.