Raj Bawa MI : इंटरनेटवर तुफान ट्रोल, मात्र नावे आहेत हे विश्वविक्रम, राज बावाबद्दल तुम्हाला या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

इंटरनेटवर तुफान ट्रोल, मात्र नावे आहेत हे विश्वविक्रम, राज बावाबद्दल तुम्हाला या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

Raj Bawa MI : इंटरनेटवर तुफान ट्रोल, मात्र नावे आहेत हे विश्वविक्रम, राज बावाबद्दल तुम्हाला या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

राज अंगद बावा हे नाव आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं असेल. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात शेवटच्या षटकात त्याला 15 धावा वाचवता आल्या नाहीत या कारणामुळे त्याला समाज माध्यमांवर तुफान ट्रोल केलं जातंय. राज बावा हा फक्त मुंबईसाठी खेळतो एवढेच त्याच्याबाबतीत लोकांना माहीत आहे. राज अंगद बावाचं ऑलिम्पिक कनेक्शन काय ? त्याचे वडील कोण आहेत ? आजोबा कोण आहेत ? त्याने 19 वर्षांखालील विश्वचषकात कोणते विक्रम केले हे जास्त याबद्दल लोकांना माहीत नाही. या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. 
 

हेही वाचा  – Vaibhav Sooryavanshi International Debut | वैभव सूर्यवंशीचं आतंरराष्ट्रीय पदार्पण लांबणार ?; वैभवपुढे 'या' खेळाडूंचं आव्हान

राज अंगद बावा चंदीगडसाठी क्रिकेट खेळतो. तो 2022 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतासाठी खेळला होता. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. त्याने 5 सामन्यांत 252 धावा केल्या आणि 9 विकेट्सदेखील घेतल्या. त्याने युगांडाविरुद्ध 162 धावांची नाबाद खेळी केली होती. 2022 मध्ये ही धावसंख्या भारतासाठी सर्वाधिक होती. त्याचं हे रेकॉर्ड वैभव सूर्यवंशी याने मोडलं. याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि 35 धावादेखील केल्या होत्या. अंतिम सामन्याचा तो सामनावीर ठरला होता. यानंतर त्याला यापुढचा हार्दिक पंड्यादेखील म्हटलं जाऊ लागलं होतं. या स्पर्धेतील यशानंतर त्याला लगेच इंडिया ए साठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याची गोलंदाजीतली कामगिरी चांगली राहिली मात्र फलंदाजीत त्याला तितके यश गवसले नाही. त्याला आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सने २ कोटी देऊन संघात समाविष्ट केलं. त्याला संघात घेण्यासाठी पंजाब, मुंबई आणि हैदराबादमध्ये शर्यत सुरू होती. 2022 मध्ये तो दोन सामने खेळला. त्याच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने 11 धावा केल्या त्यानंतर मात्र त्याला पंजाबकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. 

हेही वाचा – Unknown Story of Frankie | या पदार्थाला फ्रँकी का म्हणतात, त्या मागची रंजक कहाणी ऐकून व्हाल थक्क!

त्याचे आजोबा तरलोचन सिंग बावा हे महान हॉकी खेळाडू होते. ते भारतासाठी खेळले आहेत. 1948 मध्ये भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले होते. संघाच्या या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजचे बावा सुखविंदर बावा हे  पंजाबमधल्या प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक आहेत. ते युवराज सिंग आणि व्हीआरव्ही सिंगचे प्रशिक्षक होते. लहानपणापासून राजचा आवडता खेळाडू युवराज सिंग होता. पुढे जाऊन तो युवराजप्रमाणेच अष्टपैलू खेळाडू झाला आणि एक उत्तम क्षेत्ररक्षकदेखील. राजला बंगळुरूविरुद्धच्या त्याच्या कामगिरीवरून  त्याला ट्रोल केलं जात आहे. पण, एका खराब कामगिरीनंतर खेळाडूला वाईट ठरवणे ही समाजमाध्यमांची जणू रीतच झालेली आहे. राज पुढच्या सामन्यांत चांगली कामगिरी करून सर्व ट्रोलर्सचे तोंड बंद करेल अशी अपेक्षा आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number