‘राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं’

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना भवनासमोर फलक लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या फलकामधून देण्यात आली आहे. […]

‘राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं’

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना भवनासमोर फलक लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या फलकामधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे फलक लावले आहेत. मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या फलकावर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

“महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्र सैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती,” असं लक्ष्मण पाटील यांनी या फलकावर लिहिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number