जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील मैत्रीपूर्ण गुपित उघड आहे. राज ठाकरेंची भारतीय जनता पक्षाची असलेली ही मैत्री आता थेट पोहोचलीय नाशकात.
गिरीश बापट आणि राज ठाकरेंमध्ये 10 मिनिटं चर्चा झालीय. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीय.
पुण्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मनसैनिकांवर दाखल केलेल्या अजामीनपात्र गुन्ह्याबाबत राज ठाकरेंनी गिरीश बापट यांच्यासमोर नाराजी व्यक्त केलीय.
आता या नाराजीनाट्यानंतर ही मैत्री कुठपर्यंत जाते ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगवली जातेय.