पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? हे करून पहा

पावसाळा सर्वांना हवाहवासा जरी वाटत असला तरी पावसाळा सोबत येताना बऱ्याच समस्याही घेऊन येतो. आरोग्याच्या समस्या तर जाणवतातच पण त्यासोबतच पावसाळ्यात अनेकदा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमध्ये पाणी साचते. त्यामुळे वाहनाच्या इंजिनपासून वायरिंगपर्यंत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर काय करावे? पाहूया : गाडीत पाणी शिरल्यानंतर गाडी लगेच सुरू करू नका पूरात किंवा रस्त्यावरील […]

पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? हे करून पहा

पावसाळा सर्वांना हवाहवासा जरी वाटत असला तरी पावसाळा सोबत येताना बऱ्याच समस्याही घेऊन येतो. आरोग्याच्या समस्या तर जाणवतातच पण त्यासोबतच पावसाळ्यात अनेकदा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमध्ये पाणी साचते. त्यामुळे वाहनाच्या इंजिनपासून वायरिंगपर्यंत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर काय करावे? पाहूया :

गाडीत पाणी शिरल्यानंतर गाडी लगेच सुरू करू नका

पूरात किंवा रस्त्यावरील पाण्याची पातळी वाढून तुमच्या वाहनात पाणी शिरले, तर सर्वप्रथम वाहन सुरू करणे टाळावे, असे न केल्यास तुमच्या वाहनाचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. कार मॅन्युअली अनलॉक करा आणि सर्व दरवाजे उघडा.

जर कारमध्ये जास्त पाणी असेल तर ते काढून टाकावे आणि थोडी हवा कारच्या आतील भागात जाऊ द्या. कारमधील कोणतीही विद्युत यंत्रणा चालू करणे टाळा. तसेच, कार पूर्णपणे कोरडी होऊ द्या आणि आवश्यक असल्यास कार लवकर कोरडी करण्यासाठी पोर्टेबल फॅन वापरा.

कारमधील इलेक्ट्रिक यंत्रणेचे कोणतेही नुकसान झाले नाही हे एकदा पाहिल्यानंतर पुढची पायरी म्हणजे लिक्विड बदलणे. इंजिन ऑइल, गिअरबॉक्स ऑइल, डिफरेंशियल ऑइल, पॉवर स्टीयरिंग फ्लुइड आणि क्लच फ्लुइड काढून टाका. कूलंट देखील बदला, कारण दूषित पाणी चुकून सिस्टीममध्ये गेले नुकसान आणखी वाढेल. तेव्हा एअर फिल्टर देखील बदला.

फ्यूल टँक रिकामा करा

एकदा सर्व लिक्विड बदलल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे फ्यूल टँक रिकामी करा, कारण त्यात पाणी शिरण्याची शक्यता असते. फ्यूल टँकमध्ये मिसळलेले पाणी सिलेंडर, फ्यूल इंजेक्टर/कार्ब्युरेटर आणि इतर कंपोनेंट्समध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number