Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धडाका! पुढील 24 तासांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धडाका! पुढील 24 तासांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहून तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

तसेच ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हेही वाचा- Palghar : पालघरमध्ये मच्छीमारांनी दाखवलं अद्वितीय शौर्य; पूराच्या प्रवाहात अडकलेल्या चिमुकल्याच्या बचावाचा थरारक व्हिडिओ समोर

यावेळी मुंबईसह पालघर, ठाणे आणि कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे.

गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग आज देखील कायम आहे. गेल्या चार दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा 80 टक्क्यांवर आला आहे. यावेळी दारणा, गंगापूर, कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव, ओझरखेड, गौतमी गोदावरी, कश्यपी, वालदेवीसह इतर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

हेही वाचा- Shahapur waterfall accident: शहापूर चोंढा घाटघर धबधब्यावर ढगफुटी सदृश पाऊस; दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत गेल्या चार दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरु असून या  जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा वर्तावण्यात आला असून हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुणे शहर आणि परिसरात 31 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. तसेच शहरात अधूनमधून उघडीप, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. 

विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी बीड आणि परभणी जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number