Mumbai Rain : महिनाभरानंतर वरुणराजा बरसला! मुंबईत अनेक भागात पाणीच पाणी; महापालिकेकडून विशेष ट्विट

जून महिन्याचे 15 दिवस कोरडे गेल्यानंतर मुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात मान्सून सक्रिय झाला असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे.

Mumbai Rain : महिनाभरानंतर वरुणराजा बरसला! मुंबईत अनेक भागात पाणीच पाणी; महापालिकेकडून विशेष ट्विट

जून महिन्याचे 15 दिवस कोरडे गेल्यानंतर मुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात मान्सून सक्रिय झाला असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. पूर्व उपनगरात देखील पावसाची जोरदार हजेरी लागली असून  रात्रभर संततधार पडत असल्यामुळे भांडुप आणि इतर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

पहिल्याच पावसात नाल्यांची पोलखोल झाली असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तसेच भांडुप कोकण नगर विभागात सकल भागात पाणी साचले आहे. एकीकडे पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरी दीर्घकाळ वीज खंडित राहिल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. 

हेही वाचा- Monsoon Update Maharashtra: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, 30 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट…

तसेच सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत मध्यरात्री पासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पनवेलहून नवी मुंबईला येताना अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. तर लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

यादरम्यान हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विज्यांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत मुंबई महापालिकेकडून पालघर आणि मुंबईला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटमध्ये म्हटले की, “हवामानाची माहिती: नाऊकास्ट वॉर्निंग दिनांक: २४-०६-२०२६ जारी करण्याची वेळ: ०४०० वा. (भारतीय प्रमाणवेळ) वैधता: ३ तास, रेड वॉर्निंग हवामान: काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४०-६० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह तीव्र ते अति तीव्र पावसाच्या सरींची दाट शक्यता आहे. जिल्हे: मुंबई, पालघर खबरदारी घ्या – आयएमडी मुंबई”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number