मुंबईला कुणीच वाली नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंगळवारी संध्याकाळपासून मुंबई एकीकडे पावसानं झोडपली जात असतानाच दुसरीकडे भीतीच्या सावटाखाली दडपली गेली. पावसाचा जोर कमी झाला असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.   अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल मात्र नेमकं काय घडतंय ते सामान्य मुंबईकरांना स्पष्ट होत नव्हतं. काहिंनी कार्यालयातच मुक्काम ठोकला. सर्वांत मोठी अनिश्चितता होती ती मुलांच्या शाळांबद्दल. याबाबत पालकांनी […]

मुंबईला कुणीच वाली नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंगळवारी संध्याकाळपासून मुंबई एकीकडे पावसानं झोडपली जात असतानाच दुसरीकडे भीतीच्या सावटाखाली दडपली गेली. पावसाचा जोर कमी झाला असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

 

अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल मात्र नेमकं काय घडतंय ते सामान्य मुंबईकरांना स्पष्ट होत नव्हतं. काहिंनी कार्यालयातच मुक्काम ठोकला. सर्वांत मोठी अनिश्चितता होती ती मुलांच्या शाळांबद्दल. याबाबत पालकांनी चौकशी सुरु केली.

 

मात्र, कुठूनच काही कळत नव्हतं. त्यातच कुणीतरी शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं जुन ट्विट तारीख बदलून व्हायरल केले. चौकशी केल्यावर ते जुनं असल्याचं उघड झालं. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. अखेर शिक्षणमंत्र्यांनी रात्री अकराच्या सुमारास मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

 

मोठ्या पावसाबद्दल संमिश्र अंदाज व्यक्त होत असल्याने सुरक्षेसाठी सुट्टी देण्यात आली. मात्र, या सर्व गोंधळात मुंबईतरांच्या छातीत धडकी भरत होती ती योग्य माहितीच्या अभावाने.

 

मुंबई महापालिका, राज्य सरकार यांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशा आणिबाणीच्यावेळी सर्वाधिक सक्रीय पाहिजेत. त्यांनी समन्वय साधला पाहिजे. मात्र, तसं घडताना दिसलं नाही. आपत्तीच्या वेळी माहितीचं व्यवस्थापन करण्यात सर्वच यंत्रणा कमी पडल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number