जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या प्राधान्य द्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात 22 ऑक्टोबर रोजी मर्यादित स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
याच दिवशी मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण भागात देखील वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अतिवृष्टीची शक्यता आहे.