हा पावसाळा की हिवाळा? शेतकरी चिंतातूर

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद बुधवारी मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यात तुरीला आलेल्या फुलोरा आणि कळीला मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढणीला आलेला कापूस पूर्ण भिजल्याने पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षात दुष्काळाने […]

हा पावसाळा की हिवाळा? शेतकरी चिंतातूर

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

बुधवारी मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यात तुरीला आलेल्या फुलोरा आणि कळीला मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढणीला आलेला कापूस पूर्ण भिजल्याने पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहे.

गेल्या काही वर्षात दुष्काळाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पावसाचा काळ बदलला आहे का प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number