शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्यानं आणि गेल्या 3 आठवड्यांत परिस्थिती अनुकूल असल्यानं पाऊस जास्त पडण्य़ाची शक्यता आहे. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटलं.   भारतात जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील 70 टक्के […]

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्यानं आणि गेल्या 3 आठवड्यांत परिस्थिती अनुकूल असल्यानं पाऊस जास्त पडण्य़ाची शक्यता आहे. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटलं.

 

भारतात जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील 70 टक्के पाऊस या काळात पडत असल्यानं शेतीचं गणित प्रामुख्याने या पावसावर ठरतं. शेतीचं मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं ठरतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या पावसाकडे लागून राहिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number