निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे अंतिम सामन्याचं भवितव्य पावसाच्या हातात असणार असचं दिसून येत आहे. सध्या भारत आणि […]

निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे अंतिम सामन्याचं भवितव्य पावसाच्या हातात असणार असचं दिसून येत आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ मालिकेत 2-2 गुणांसह बरोबरीत असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र आता या निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट उभं ठाकलं आहे. यावेळी 88 टक्के पावसाची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. त्यामुळे, मग संध्याकाळी हवामान कसे असेल? पावसामुळे खेळात व्यत्यय येईल का? हे जाणून घेणेही गरजेचे आहे. ॲक्यूवेदर डॉट कॉमच्या मते, रविवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये तापमान २१ अंश असेल आणि पावसाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे संध्याकाळीही ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी २८ किमी असा असेल. अशा स्थितीत सामन्यावर पावसाचे सावट पडू शकते. या स्थितीत क्रिकेटप्रेमींना पुर्ण २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळण्याची आशा कमी आहे.

भारताने बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले आहेत. या मैदानावर ५ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ३ सामन्यात यश मिळाले. तसे, मैदान लहान असल्यामुळे येथे बरेच चौकार, षटकार मारले जातात. यापूर्वीही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडला आहे. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १५४ तर दुसऱ्या डावाची सरासरी १४३ धावांची राहिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number