गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; अवकाळीचा धान पिकाला फटका बसण्याची शक्यता

गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.

गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; अवकाळीचा धान पिकाला फटका बसण्याची शक्यता

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला असून  पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले .मात्र या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक, मका पिक हे आता कापणीला आले आहे.अनेक शेतकऱ्यांनी धान पीक कापून शेतात ठेवले आहे . पावसामुळे धान पीक खराब होऊ शकते. शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा पाऊस असून याचा फटका शेतकऱ्यांना पडत असताना दिसत आहे. मात्र उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणामध्ये आता गारवा निर्माण झाला असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद; 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

गोंदियामध्ये अवकाळी पावसानं दाणादाण

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून नुकसानग्रस्त पिके व घरे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे सडक अर्जुनी तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number