मोटरमनशिवाय धावली रेल्वे

वृत्तसंस्था, कर्नाटक कर्नाटकातील वाडी जंक्शनवर मोटरमनशिवाय रेल्वे इंजिन धावल्याची घटना घडली आहे. चक्क 13 किलोमीटरपर्यंत हे रेल्वे इंजिन मोटमनशिवाय धावलं आहे. या सर्व प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली असून रेल्वेप्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. वाडी स्थानकात इंजिन बदलण्यासाठी गाडी थांबली असता मोटरमननं नवं इंजिन जोडलं. यानंतर मोटरमन खाली उतरला. मात्र, नवीन इंजिनचा ताबा […]

मोटरमनशिवाय धावली रेल्वे

वृत्तसंस्था, कर्नाटक

कर्नाटकातील वाडी जंक्शनवर मोटरमनशिवाय रेल्वे इंजिन धावल्याची घटना घडली आहे. चक्क 13 किलोमीटरपर्यंत हे रेल्वे इंजिन मोटमनशिवाय धावलं आहे. या सर्व प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली असून रेल्वेप्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. वाडी स्थानकात इंजिन बदलण्यासाठी गाडी थांबली असता मोटरमननं नवं इंजिन जोडलं.

यानंतर मोटरमन खाली उतरला. मात्र, नवीन इंजिनचा ताबा घेण्याआधीच ते सुरू झालं. त्यानंतर मोटरमनने फिल्मी स्टाईलने बाईकने इंजिन गाठलं. आणि इंजिनचा वेग मंदावताच इंजिनमध्ये उडी घेऊन त्याने ते थांबवलं. त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. मात्र, जर प्रवासी डबे असणाऱ्या गाडीला अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या घटनेतून रेल्वेचा बेजबाबदारपणा समोर येतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number