रेल्वेचे तिकिट दर लवकरच वाढणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वेच्या तिकिट दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. कारण तिकिटांचे दर वाढ​वण्यासंदर्भातील पाच प्रस्तावांवर विचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.   त्यामध्ये दरमहा दरांमध्ये एक टक्का वाढ करण्यापासून एकरकमी दहा टक्के वाढीच्या शिफारशीचा समावेश आहे. या प्रस्तावांमध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सेवांमधील फ्लेक्सी फ्लेअर योजना […]

रेल्वेचे तिकिट दर लवकरच वाढणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वेच्या तिकिट दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. कारण तिकिटांचे दर वाढ​वण्यासंदर्भातील पाच प्रस्तावांवर विचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

त्यामध्ये दरमहा दरांमध्ये एक टक्का वाढ करण्यापासून एकरकमी दहा टक्के वाढीच्या शिफारशीचा समावेश आहे. या प्रस्तावांमध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सेवांमधील फ्लेक्सी फ्लेअर योजना संपुष्टात आणण्याचाही समावेश आहे.

 

तर सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्यांना या दरवाढीपासून दूर ठेवण्याचाही एक प्रस्ताव आहे. मात्र, दरांमध्ये नेमकी किती वाढ करायची याचा अंतिम निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number