रेल्वे स्थानकांवरील मोबाईल चोरट्यांना सीसीटीव्हीचा धाक…

जय महाराष्ट्र वेब न्यूूज, मुंबई मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकवेळा चोरीच्या मोबाईलचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी देखील होतो.  सध्या लोकल ट्रेन प्रवासात मोबाईल चोरी होण्याची प्रकरणं जास्त ऐकण्यात येतात. रेल्वेत गर्दीच्या वेळी मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या, स्थानकांजवळ उभं राहून मोबाईल हातातून हिसकावून घेणं असे प्रकार होतात, परंतु रबाळे रेल्वे स्थानकात चोरीचा नवीनच प्रकार समोर आला. रबाळे रेल्वे स्थानकात रात्रीच्या […]

रेल्वे स्थानकांवरील मोबाईल चोरट्यांना सीसीटीव्हीचा धाक…

जय महाराष्ट्र वेब न्यूूज, मुंबई

मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकवेळा चोरीच्या मोबाईलचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी देखील होतो. 

सध्या लोकल ट्रेन प्रवासात मोबाईल चोरी होण्याची प्रकरणं जास्त ऐकण्यात येतात. रेल्वेत गर्दीच्या वेळी मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या, स्थानकांजवळ उभं राहून मोबाईल हातातून हिसकावून घेणं असे प्रकार होतात, परंतु रबाळे रेल्वे स्थानकात चोरीचा नवीनच प्रकार समोर आला.

रबाळे रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर झोपलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत उघडकीस आली आहे. 

आनंद खोडेकर याचा झोपेत असताना एका चोराने मोबाईल लंपास केला. ही चोरीची घटना रबाळे रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती. रेल्वे पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या चोराचा शोध सुरू केला होता. अखेर 26 ऑगस्ट रोजी आरोपी तुर्भे येथे आल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले असता विजय यादव या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी पकडले. विजय यादव गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे आता प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number