रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याण डाऊन फास्ट, हार्बरवर नेरूळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे ऐन थर्टीफस्टच्या काळात प्रवाशांचे हाल […]

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याण डाऊन फास्ट, हार्बरवर नेरूळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे ऐन थर्टीफस्टच्या काळात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

 

Mega-Block.jpg

 

कशा प्रकारे असणार रेल्वेचा मेगाब्लॉक :

मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याणमध्ये डाऊन फास्ट मार्गावर स. 10.30 ते दु. 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक

दिवा ते कल्याणमधील डाऊन फास्ट वाहतूक डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात नवीन पादचारी पूल बांधण्याच्या काममुळे आज रात्री विशेष ब्लॉक

मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बरवर नेरूळ ते पनवेलमध्ये स. 11.30 ते दु. 4.30 या वेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर

नेरूळ ते पनवेलमधील अप आणि डाऊन वाहतूक स. 10.03 ते दु. 4.30 वाजेपर्यंत बंद असणार

ट्रान्सहार्बरवरील वाहतूकदेखील नेरूळ ते पनवेलदरम्यान स. 11.02 ते दु. 4.26 वाजेपर्यंत बंद असणार

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार

सांताक्रूझ ते माहीममध्ये अप व डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number