आज मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक; रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मध्य रेल्वेवर आज, शनिवारी कल्याण ते कसारा मार्गावर मध्यरात्री 2.30 ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याणहून आसनगाव, कसाऱ्यासाठी सुटणाऱ्या लोकल पहाटे 5.28 ते सकाळी 7.32 पर्यंत टिटवाळ्याच्या दिशेने चालविल्या जातील. मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आटगाव येथे पुलाच्या गर्डरच्या […]

आज मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक; रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वेवर आज, शनिवारी कल्याण ते कसारा मार्गावर मध्यरात्री 2.30 ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याणहून आसनगाव, कसाऱ्यासाठी सुटणाऱ्या लोकल पहाटे 5.28 ते सकाळी 7.32 पर्यंत टिटवाळ्याच्या दिशेने चालविल्या जातील.

मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आटगाव येथे पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे टिटवाळा आणि कसारा दरम्यान काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, काही मेल/एक्स्प्रेस गाड्याही नियमित वेळेपेक्षा 10 मिनिटे ते 1 तास 10 मिनिटे उशिरा चालतील. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी महत्त्वाचे काम असल्यास आणि रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number