जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जी रेल्वे सुविधा आहे, ती जपायचं राहिलं अन सरकार बुलेट ट्रेन आणायला निघालेत असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केला आहे.
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू बुलेट ट्रेन ऐवजी रेल्वेतील उपाययोजनेसाठी आग्रही होते, म्हणूनच त्यांची उचलबांगडी करण्यात आली असा आरोपही पवारांनी केला. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.