जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परळ रेल्वे स्थानकाशेजारच्या चाळींवर संक्रांत आली आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने परळ स्थानकाबाहेरील रेल्वे हद्दीतील साईदर्शन चाळीत 50 वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.
काही दिवसांत घरे रिकामी करण्यास सांगितले असल्याने चाळीतील रहिवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. इतक्या वर्षांत मध्य रेल्वे प्रशासनास कारवाई करण्याची आठवण का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
रेल्वेच्या हद्दीत असणारी अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला.