मृतांच्या कपाळावर नंबर टाकल्यानं मुंबई उच्च न्यायालय भडकलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर नंबर टाकण्याच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान उपटले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं केइएम हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. या संदर्भांत 18 जानेवरीपर्यंत उत्तर द्या, असं उच्च न्यायालय म्हटलंय. आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरज असल्याचंदेखील न्यायालयाने म्हटलं आहे.  […]

मृतांच्या कपाळावर नंबर टाकल्यानं मुंबई उच्च न्यायालय भडकलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर नंबर टाकण्याच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान उपटले.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं केइएम हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. या संदर्भांत 18 जानेवरीपर्यंत उत्तर द्या, असं उच्च न्यायालय म्हटलंय.

आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरज असल्याचंदेखील न्यायालयाने म्हटलं आहे. 

भविष्यात अशाप्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number