वाशिंद-आसनगाव लोकलसेवा बंद; प्रवाशांचा रेलरोको !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या 4 दिवसांपासून वाशिंद-आसनगाव लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. वाशिंदपर्यंत लोकलसेवा सुरू करावी अशी मागणी करत प्रवाशांनी रेलरोको केला. मुंबईकडे जाणारी लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त होऊन प्रवाशांनी दादर – अमृतसर एक्सप्रेस रोखली.   तीन दिवसांपूर्वी या मार्गावर दुरांताे एक्स्प्रेसचे काही डबे रूळावरुन घसरले […]

वाशिंद-आसनगाव लोकलसेवा बंद; प्रवाशांचा रेलरोको !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या 4 दिवसांपासून वाशिंद-आसनगाव लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. वाशिंदपर्यंत लोकलसेवा सुरू करावी

अशी मागणी करत प्रवाशांनी रेलरोको केला. मुंबईकडे जाणारी लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त

होऊन प्रवाशांनी दादर – अमृतसर एक्सप्रेस रोखली.

 

तीन दिवसांपूर्वी या मार्गावर दुरांताे एक्स्प्रेसचे काही डबे रूळावरुन घसरले होते. तेव्हापासून या मार्गावरील मुंबईकडे येणारा अप मार्ग बंद

करण्यात आला होता. या मार्गावर मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अजूनही सुरू झालेली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र डाऊन मार्गावरून

दोन्ही दिशेने चालवल्या जात आहेत. अप मार्गाच्या ट्रॅकचं काम पूर्ण न झाल्यामुळे ही लोकलसेवा बंद ठेवल्याचं सांगण्यात येतं आहे.

 

रेल्वे प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन केले त्यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर सासे यांनी आज शनिवारी

सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. तसेच गाड्या चालू न झाल्यास

प्रत्यक्ष उपोषण करण्याचा इशारा त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे व प्रवाशांना रेलरोको आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number