Murud-Janjira Fort Closed : 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद! सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ

उन्हाळी पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांनी मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. शिडाच्या होड्यांमधून जलप्रवास करत पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्याचा आनंद घेत आहेत.

Murud-Janjira Fort Closed : 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद! सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ

उन्हाळी पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांनी मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. शिडाच्या होड्यांमधून जलप्रवास करत पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्याचा आनंद घेत आहेत. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांनी राजपुरी जेट्टीवर गर्दी केली आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पावसाळ्याच्या हंगामासाठी 26 मे पासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय मेरी टाइम बोर्डाने घेतला आहे.

हेही वाचा- NEET Paper Leaked Connection: नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडच्या अंबाजोगाईपर्यंत! CBI च्या चौकशीत मोठा खुलासा

नियमानुसार समुद्राला येणारे वादळीवारे व लाटांचा वाढत जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 26 मेपासून बंद होणारा हा किल्ला सप्टेंबर महिन्यात पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरवर्षी सरासरी पाच लाखांहून अधिक पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात. त्यामुळे या आठवड्यात इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जेमतेम आठवडाभर किल्ला पाहता येणार असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी जंजिरा किल्ल्यावर येत आहेत. दरम्यान राजपुरी धक्क्यावर प्रचंड गर्दी होत असून, तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number