जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील फेरीवाले हटाव आंदोलनानंतर आता मनसे रायगडमध्ये मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालीय.
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात मनसेनं दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मागणीसाठी मनसे स्टाईलनं आंदोलन केलं.
या आंदोलनामुळे खोपोली पोलीस स्टेशन आवारात व्यापारी विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
मनसेनं बाजारपेठेत जोरदार घोषणाबाजी करून दुकानांच्यावर असणाऱ्या इंग्रजी पाट्यांवर काळी शाई फेकून आंदोलन केले.