Raigad Crime: रायगड हादरलं! दारूच्या नशेत पतीचा संताप अनावर; पत्नीने जाब विचारताच कोयत्याने वार

रायगडच्या माणगाव तालुक्यात दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला

Raigad Crime: रायगड हादरलं! दारूच्या नशेत पतीचा संताप अनावर; पत्नीने जाब विचारताच कोयत्याने वार

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कौटुंबिक वादाचे अत्यंत भीषण रूप समोर आले आहे. पती दारू पिऊन घरी आल्याचा जाब पत्नीने विचारल्यानंतर संतापलेल्या पतीने तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला असून तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना माणगाव तालुक्यातील हर्णे आदिवासी वाडी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हिलम हा दारूच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी पत्नी पूजा हिलम हिने त्याला दारू पिऊन का आला, असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले.

हेही वाचा: TET Exam Paper Leak Update : भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई; महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर पाटणा येथून मुख्य आरोपी अटकेत

संतापाच्या भरात महेश हिलम याने प्रथम पत्नीला हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने घरातील कोयता उचलून तिच्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पूजाच्या डाव्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला. तसेच तिच्या डोक्यावरही गंभीर वार झाल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जखमी महिलेला उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयिताला सीबीआयकडून क्लिन चीट; तपासाला नवे वळण

या प्रकरणी जखमी पूजा हिलम हिने दिलेल्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाण्यात आरोपी पती महेश हिलम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर हर्णे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून एवढ्या टोकाची हिंसक घटना घडल्याने नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे. महिलांवरील वाढत्या कौटुंबिक अत्याचारांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number