Raigad Bus Accident: भरधाव एसटी बसचा थरार; दुचाकीस्वार अन् पादचाऱ्यांना उडवलं, तिघेजण गंभीर जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Raigad Bus Accident: भरधाव एसटी बसचा थरार; दुचाकीस्वार अन् पादचाऱ्यांना उडवलं, तिघेजण गंभीर जखमी

रायगड: राज्यात चालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि तांत्रिक बिघाडांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून, काहींना गंभीर जखमांचा सामना करावा लागत आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथे भरधाव एसटी बसने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी बागमांडला परिसरात हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हेही वाचा: Central Railway: फुकट्या प्रवाशांना दणका; एप्रिल महिन्यात तब्बल इतक्या कोटींची वसुली, विनातिकीट प्रवासावर मध्य रेल्वेची मोठी कारवाई

अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाची चूक होती की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, अपघातासंदर्भातील माहिती आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.

दरम्यान, राज्यात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालकांचे प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि रस्ते सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा: Famous Producer Dies:’सूर्यवंशम’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे निर्माते आर.बी. चौधरी यांचे भीषण अपघातात निधन; सिनेसृष्टी शोकसागरात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number