जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
रायगडच्या अलिबाग समुद्रात मंगळवारी 2 पर्यटक बुडाले. ऋषभ शिल्वा आणि सोहराब खान अशी या पर्यटकांची नावं आहेत.
आपल्या मित्रांसोबत ते अलिबाग समुद्रावर फिरायला आले होते. 5 तरुणांपैकी तिघं कुलाबा किल्ल्यात गेले होते. तिथून परतताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यातील दोघं समुद्रात बुडाले.
त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. सोहराबचा मृतदेह सापडला असून, ऋषभचा शोध सुरू आहे.