राहुल गांधी यांचा तिरंगा हातात घेऊन एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तर त्या व्हिडिओमागे सुरु असलेलय पार्शवसंगीतात शिवरायांशी तुलनात्मक शब्दांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे, ‘राहुल गांधी यांची शिवरायांशी केलेली तुलना अयोग्य’ असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे आणि तातडीने काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ‘राहुल गांधी यांची शिवरायांशी केलेली तुलना अयोग्य’ असा आक्षेप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.