नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या लोकसभेतील चर्चेचा बुधवारचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी बोलावं अशी मागणी काही खासदारांनी केली होती. मात्र, पहिल्या दिवशी राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेस खासदार गौरव गोगोई बोलण्यासाठी उभे राहिले.
राहुल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, काय म्हणाले राहुल गांधी?
दरम्यान, बुधवारी दुसऱ्या दिवशी अखेर राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले आहेत. भाषणाच्या सुरूवातीलाच राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. यासोबतच राहुल गांधी यांनी माझ्या मागच्या वेळच्या भाषणामुळे तुम्हाला त्रास झाला,पण आज तुम्ही घाबरायची गरज नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
अहंकार बाजूला ठेवला तर, लोकाचं मत समजतं. माझ्यात सुद्धा भारत जोडो यात्रेआधी अहंकार होता. मात्र, यात्रा सुरू केल्यानंतर हा अहंकार संपुष्टात आला, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपर्यंत मणिपूरला गेले नाहीत. मोदींसाठी मणिपूर भारतासाचा भाग नाही. अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.