वृत्तसंस्था, मुंबई
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केलाय. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलचा भाव कमी झाला की नाही ? असा सवाल जनतेला विचारताना दिसतायत.
त्यांच्या या प्रश्नावर सलमान खान खळखळून हसताना दाखवण्यात आलाय. मोदींचा हा व्हिडीओ एका सभेतील आहे. तर सलमानचा व्हिडीओ कॉमेडी सर्कस या कॉमेडी शोमधील आहे. राहुल गांधींनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदींची खिल्ली उडवलीय.