जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झालाय. तर, अनेकजण जखमी झालेत. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस बिस्ट्रो पबमध्ये भीषण असे अग्नितांडव झाले. त्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राहुल गाधींनी या घटने संदर्भात ट्विट केले आहे.
‘मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.