वृत्तसंस्था, मंदसौर
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना अटक झाली आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघाले असता राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आली.
मध्य प्रदेशच्या सीमेवर राहुल गांधींना पोलिसांनी रोखलं. त्यानंतर पोलिसांना चकवा देत राहुल गांधी बाईकवरून निम्बाडाहून मंदसौरच्या दिशेनं निघाले. मात्र, निमचमध्ये त्यांना पोलिसांनी अटक केलं.
दरम्यान, मध्य प्रदेशात राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी लोकल रोखली. राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.