‘मोदी चौकीदार नव्हे भागीदार’ – राहुल गांधी

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ऐतिहासिक बैठक सेवाग्राम येथे होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे उपस्थित आहेत. या बैठकीसह दिवसभर अनेक कार्यक्रम होणार आहेत. या बैठकीनंतर झालेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, राफेल विमान […]

‘मोदी चौकीदार नव्हे भागीदार’ – राहुल गांधी

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ऐतिहासिक बैठक सेवाग्राम येथे होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे उपस्थित आहेत. या बैठकीसह दिवसभर अनेक कार्यक्रम होणार आहेत. या बैठकीनंतर झालेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, राफेल विमान खरेदी, भ्रष्टाचार, रोजगार, उद्योगपतींना दिली जाणारी कर्जमाफी यावरुन राहुल यांनी मोदींवर कडाडून टीका केली.

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

  • शेतमालाला योग्य दर मिळण्याचं मोदींचं आश्वासन हवेत विरलं – राहुल गांधी
  • राफेल खरेदीवरुन जोरदार हल्लाबोल – राहुल गांधी
  • मोदींनी आश्वासनं पाळली नाहीत – राहुल गांधी
  • अनिल अंबानींकडे विमान निर्मितीचा अनुभव नाही – राहुल गांधी
  • तुमच्याकडचा पैसा मोदींनी हिसकावून घेतला – राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी भाषणातून जातीय तेढ निर्माण करतात – राहुल गांधी
  • मोदींनी जनतेच्या खिशातला पैसा अंबानींना दिला – राहुल गांधी
  • लाल किल्ल्यावरुन मोदींनी देशाचा अपमान केला – राहुल गांधी
  • मोदींनी तुम्हाला काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी रांगेत उभं केलं, त्यावेळी श्रीमंत उद्योगपती कुठे होते – राहुल गांधी
  • नोटाबंदीनंतर बँकांसमोरील रांगेत किती सूटबूटवाले होते, नीरव, ललित, माल्ल्या रांगेत दिसले का? – राहुल गांधी
  • मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात – राहुल गांधी
  • मोदी चौकीदार नव्हे भागीदार – राहुल गांधी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number