भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका – राहुल गांधी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाला 133 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राजकीय फायद्यासाठी भाजप खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण […]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका – राहुल गांधी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्षाला 133 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

‘राजकीय फायद्यासाठी भाजप खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका असून घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थानं करत आहे, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.

आपल्या देशाची पायाभरणी करणाऱ्या घटनेलाच आज भाजपपासून धोका निर्माण झाला आहे. भाजपचे नेतेही त्यावर उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. घटना बदलण्यासाठी गुपचूप कारस्थानं सुरू असून घटनेला वाचविण्याची आपल्यावरच जबाबदारी असल्याचंही राहुल यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number