राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष; तब्बल19 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला नवा अध्यक्ष

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. 4 डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, राहुल यांना अध्यक्षपदासाठी कोणीही […]

राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष; तब्बल19 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला नवा अध्यक्ष

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

4 डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता.

उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, राहुल यांना अध्यक्षपदासाठी कोणीही आवाहन न दिल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

16 डिसेंबरला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number