राहुल गांधींनी करवून घेतलं स्वतःला अटक!

सीबीआय अधिकाऱ्यांच्या पदावरून झालेल्या उचलबांगडीला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आज नवी दिल्ली येथे सीबीआय मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबतच त्यांच्या शेकडो अनुयायांनाही ताब्यात घेण्यात आलंय. सीबीआयमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा दावा करत काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या […]

राहुल गांधींनी करवून घेतलं स्वतःला अटक!

सीबीआय अधिकाऱ्यांच्या पदावरून झालेल्या उचलबांगडीला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आज नवी दिल्ली येथे सीबीआय मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबतच त्यांच्या शेकडो अनुयायांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

सीबीआयमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा दावा करत काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. चौकीदार चौर है अशी नारेबाजीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा दयाल कॉलेजपासून ते सीबीआय मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर मार्क्सवादी नेते डी. राजा तसंच तृणमूलचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते.

निदर्शनं सुरू असतानाच राहुल गांधी यांनी दुपारी स्वतःला अटक करून घेतलं. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत आणि प्रमोद तिवारी यांसारख्या नेत्यांनाही अटक करण्यात आली. या सर्वां ना दिल्ली येथील लोढी रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. काहीवेळानंतर राहुल गांधी यांची सुटका झाली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number